द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करावी | – महेश खराडे | दरवर्षी १०० कोटीचा गंडा, पोलीस व बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा

0
सांगली : सांगली जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 100 कोटीचा गंडा द्राक्ष दलाल शेतकऱ्यांना घालतात,त्यामुळे द्राक्ष दलालाची नोंदणी करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा.शेतकऱ्यांनीही दलालाकडून आधार कार्ड,चेक घ्यावेत,असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

 

निवेदनात म्हटले आहे, राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते जिल्ह्यात दीड लाख एकर द्राक्ष शेती केली जाते. तासगाव, पलूस, जत, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा आदी तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जाते.या तालुक्यात द्राक्ष खरेदीसाठी दक्षिण आणि उत्तर भारतातून दलाल येतात पण त्याची कुठेही नोंद केली जात नाही,त्यांना कोणताही परवाना नाही. त्याच्याकडून डिपॉजिट घेतले जात नाही.त्यामुळे हे दलाल मनमानी पद्धतीने द्राक्ष खरेदी करतात सुरुवातीला गावोगाव पटर नेमतात त्यांना कमिशन देतात. त्याच्या मार्फत सुरुवातीला रोखीने व्यवहार करून विश्वास संपादन करतात.

 

एक दिवस ज्यादा दराचे आमिष दाखवून द्राक्ष खरेदी करतात आणि पोबारा करतात.त्याचे गाव, नाव, पत्ता काहीच माहिती नसल्याने तक्रार करणेही शक्य होत नाही. त्यामुळेच प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दलालाची नोंदणी संभधीत पोलीस स्टेशन आणि बाजार समितीमध्ये करावी.जेणे करून कोण दलाल कुठून आला.त्याचे गाव नाव कळेल त्याच्याकडून बाजार समितीने डिपॉझिट घ्यावे.शेतकऱ्यांनीही तेवढी माहिती घ्यावी आधार कार्ड, चेक घ्यावेत शक्यतो रोखीनेच व्यवहार करावेत काही खबरदारी शेतकरी घ्यावी आणि प्रशासनाने ही याबाबतीत सकारात्मक पुढाकार घ्यावां,असे आवाहन खराडे यांनी केले आहे.यावेळी प्रा.अजित हलिगले उपस्थित होते.
सांगली : द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करावी या मागणीचे निवेदन देताना महेश खराडे, अजित हलीगले
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.