हवामान खात्यानुसार मागील काही दिवसांत दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील हवेचा प्रभाव कमी असून येत्या काही दिवसांत जोरदार थंडी वाढणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर ते फेंब्रुवारी हे गुलाबी थंडीचा महिना मानले जातात. साधारण दरवर्षी दिवाळीनंतर बोचर्या थंडीला सुरुवात होते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून थंडी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळ होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो. थंडी सर्वानाच आवडते कारण ती आरोग्याला लाभदायक असते.
थंडीमुळे फुलझाडांना, फळझाडांना बहर येतो. पशुपक्षीसुद्धा थंडीने कुडकुडताना पहावयास मिळतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान थोर मंडळी स्वेटर, र्जकिंन, मफलर टोपी, चारदर, घोंगडी याचा उपयोग करताना दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे लोक अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणतंळ आहेत.त्यातच रबी हंगामातील पिकांना शेतकरी पाणी देत आहे. त्यामुळे थंडीमुळे गरम कपड्यांची मागणी वाढली आहे.
ग्रामीण भागाचा विचार करता ही थंडी ग्रामीण भागाचे अर्थ:कारण बदलणारी ठरेल, अशी आशा निर्माण झाली आहे. कारण जेवढी थंडी जास्त तेवढा रबीचा हंगाम उत्तमरीत्या येऊ शकतो, असा बळीराजाचा आणि कृषीतज्ज्ञांचा अनुभव आहे.