करजगीला आदर्श गाव करू  | – उपसरपंच सविता मठपती | उपसरपंच नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार

0
करजगी,संकेत टाइम्स : करजगी(ता जत) येथे नुकताच झालेल्या करजगी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन गुरुबाळ बालगांव , बाबूगौडा पटेल , गिरमल्लय्या मठपती,भीमाशंकर मेडेदार, विठ्ठल हंजगी ,शिवानंद अक्कलकोट,मम्मु पटेल, सुभाष बालगांव, जयवंत कलाबुर्गी, रावतराय तेली,सायबण्णा ककमरी, यांच्या नेतृत्वाखाली श्री जिन्नेसाहेब ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ११ पैंकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले होते.
या पँनेलच्या सविता देवेंद्रया मठपती यांची उपसंरपचपदी बिनविरोध निवड झाली.

 

नूतन सदस्य मल्लाप्पा कल्लाप्पा जंगमशेट्टी, सदाशिव आनंद कट्टीमनी, रमजान बुरान जातगार, जयश्री माळप्पा कळ्ळी, अन्नपूर्णा मलकारी चांभार, लक्ष्मी गोपाळ कांबळे, सर्व निवडून आलेले सदस्य व गावातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना नूतन उपसरपंच सविता मठपती म्हणाल्या,सर्वांना विश्वासात घेऊन विकासात्मक कामांच्या माध्यमातून करजगी गावाला आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे,तसेच मतदारांनी आमच्या पॅनलवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करीन.महिलांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करू,त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या माझा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाला.

 

याप्रसंगी वेदमूर्ती धानय्या हिरेमठ, अप्पुगौडा पाटील, बिळेणसिद्ध बिराजदार, हजरत पटेल, तलाठी बाळासाहेब जगताप,ग्रामसेवक सायबण्णा डुमणे,तम्माराय सालुटगी, व्हाईस चेअरमन रफिक पटेल, मल्लिकार्जुन अक्कलकोट, श्रीकांत शिंदे,मलकु बामणे, मुन्ना जातगार, वहिदपाशा मुजावर ,विठ्ठल डुमणे,याकूब बिराजदार,अशोक जादव,सुभाष कलबुर्गी, वजीर जातगार, कल्लप्पा अक्कलकोट,माळप्पा कळ्ळी, तुकाराम लातूर ,रेवप्पा हळके,अप्पू सारवाड,मल्लय्या मठपती,डॉ.सचीन बालगांव, जावेद पटेल, विनोद सलगर,  गोपाळ कांबळे, उत्तम कट्टीमनी, बंदेनवाज जातगार, कामण्णा लोहार, अण्णप्पा हंजगी, गुडलाल मुजावर ,देवेंद्रया मठपती, नबु बिस्ती, सागर तोनश्याळ, इरफान मुजावर, अब्दुलमुजीब इनामदार, कामण्णा बालगांव ,नागप्‍पा हंजगी,भैरसिद्ध बालगांव,

 

भीमाशंकर हणमशेट्टी, राचय्या मठपती,  सदाशिव जेऊर ,विठ्ठल बालगांव, शब्बीर पकाली, सोमनिंग बमनळ्ळी, दर्याप्पा  कट्टीमनी,रामु कोळी, जक्काप्पा चांभार, इमाम मुजावर,सायबण्णा बालगांव,मकतुम जातगार, फिरोज होसट्टी, अरबाज मुजावर, अण्णाराय डुमणे,सायबण्णा कट्टीमनी, खास करून बोर्गी,भिवर्गी,बालगाव, गावातील नेतेमंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानंद अक्कलकोट तर आभार सुभाष बालगांव यांनी मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.