जत,संकेत टाइम्स : दरीबडची (ता. जत) येथे एकाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली.आप्पासाहेब आण्णाप्पा आप्पासाहेब मल्लाड (वय ४८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दरीबडची गावापासून संख रस्त्यावर घडली. पोलिस पाटील यांनी याबाबतची माहिती जत पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी भेट देत तपास सुरू केला आहे.दरम्यान, मल्लाड यांचा खून नातेवाईकानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.आप्पासाहेब मल्लाड त्यानुसार पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

यांचा गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटक राज्यातील एका गावातील नातेवाईकासोबत हल्लेखोरांच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळले. अंधाऱ्या
रात्रीचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले असल्याचे सांगण्यात आले.पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे,पोलिस उपनिरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयिताच्या शोधासाठी पोलिस कर्नाटकात रवाना झाले आहेत.