संजयकाका मुळेच घाटमाथा ओलीताखाली | – प्रभाकर पाटील,धावत्या दौर्याने घाटमाथा ढवळला

0
घाटनांद्रे : आम्ही केवळ खोटे किंवा भावनिक बोलून मतदारांना भुलवत नाही तर जे काही असते ते रोखठोक आणि तोच आमचा खरा वारसा आहे, असे प्रखड मत भाजपा युवा नेते प्रभाकर पाटील यांनी कुंडलापुर (ता कवठेमहांकाळ) येथे एका कार्यक्रमात मांडले.अध्यक्षस्थानी सरपंच पोपटराव गिड्डे (देशमुख) होते.
यावेळी बोलताना प्रभाकर पाटील पुढे म्हणाले की संजय (काका) पाटील यांच्या आथक प्रयत्नामुळेच आज घाटमाथ्यावर टेंभूचे पाणी दाखल झाल्याने दुष्काळग्रस्त हा कलंक पुसला जात आहे.त्याचबरोबर ओलीताखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे.तसेच गायरानातील घरे कायम करण्यासाठीही संजयकाकाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर संजयकाका सारखा पाणीदार नेता लाभल्याने घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली असल्याचे मत सरपंच पोपटराव गिड्डे यांनी यावेळी व्यक्त केले,युवा नेते महादेव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कवठेमहांकाळचे राहूल गावडे,वाघोलीचे तुकाराम शिंदे,जाखापुरचे उपसरपंच अतुल पाटील,गर्जेवाडीचे दिलीप हांकारे, डोगरसोनीचे सचिन भोसलेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तद्पुर्वी प्रभाकर पाटील यांनी वाघोली,तिसंगी,गर्जेवाडी, जाखापुर गावाना धावती भेटी देऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
Rate Card
कुंडलापुर (ता कवठेमहांकाळ) येथे प्रभाकर पाटील यांचा सत्कार करताना सरपंच पोपटराव गिड्डे,महादेव पाटील व इतर.)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.