राष्ट्रीय महामार्ग १६६ वर बेवनूर गावचा दिशादर्शक फलक | संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक यांच्या मागणीला यश

0
जत,संकेत टाइम्स : राष्ट्रीय महामार्ग-१६६ (रत्नागिरी- नागपूर) वर जुनोनी.ता.सांगोला येथे बेवनूर गावचा दिशादर्शक फलक लावण्याबाबत संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
जुनोनी येथील उड्डाण पूला पासून बेवनूर, गुळवंची,वाळेखिंडी ,शेगाव,जत कडे लोक मोठ्या प्रमाणात येत-जात असतात दिशादर्शक फलक नसल्यामुळे लोकांची गैरसोय होत होती त्यामुळे बेवनूरचा दिशादर्शक फलक लावण्या संदर्भात निवेदन दिले होते.

 

 

दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी व मे.ध्रुव कन्सलटंसी सर्व्हिसेस लि. यांना पत्राद्वारे यांना बेवनूर गावचा दिशादर्शक फलक लावण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर त्यानी बेवनूर गावचा दिशादर्शक फलक लावलेला आहे.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केलेल्या मागणीला यश आलेले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.