★ राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्रदान ; जतमध्ये तुकाराम बाबांच्या हस्ते सत्कार
जत,संकेत टाइम्स : अल्पावधीतच ५२ शाखा ७०० कोटीहून अधिक ठेवी असलेल्या धनश्री मल्टीस्टेट क्रिडेट सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. धनश्री परिवाराचा हा एक गौरव असून धनश्री मल्टीस्टेट सोसायटी सर्वसामान्यांचा आधारवड बनत असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
नुकताच शिर्डी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात फेडरेशन ऑफ को- ऑप सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था व गौरव पुरस्कार संस्था गटातून धनश्री मल्टीस्टेट क्रिडेट सोसायटीला व चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना देवून गौरविण्यात आला. धनश्री संस्थेला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुकाराम बाबा यांनी जत येथील धनश्रीचे शाखाधिकारी राजेंद्र पुकळे, लिपिक महमदसलीम मकानदार, कपिल पाटील, मंगेश जाधव, राजाराम भोसले, चिकय्या मठपती, हर्षद मणेर, सुखदेव हारगे, सुनील पाटील यांचा सत्कार केला. यावेळी रासपचे भूषण काळगी, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रदीप शिंदे, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले की, एखादी संस्था उभा करणे सोपे व त्या संस्थेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी यांची गरज असते. धनश्रीने याच बळावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. धनश्रीच्या माध्यमातून ५२ शाखेतून हजारो तरुणांच्या हाताला काम तर मिळालेच त्याचबरोबर सर्वसामान्यांना कर्ज वाटप करून त्यांचे हितही जोपासले आहे.