डफळापूर,संकेत टाइम्स : महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा डफळापूर ता.जत येथील शाखेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.डफळापूरचे प्रथम नागरिक सुभाषराव गायकवाड,जत पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक अभिजीत चव्हाण,प्रा.बी आर पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण त्याचबरोबर शेजारील कर्नाटक राज्य असं मोठं कार्यक्षेत्र घेऊन सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली ही संस्था असून ग्राहकांचे हित व ठेवीदारांचा विश्वास जपत सहकार क्षेत्रामध्ये दिमाखात उभी आहे.
इथे नांदते लक्ष्मी,देते विश्वासाची हमी हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या या संस्थेच्या वतीने ठेवीदारांसाठी अनेक आकर्षक योजना सुरू केलेल्या आहेत.सुमारे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी असलेली एलकेपी पेन्शन योजना, 13 महिन्यांकरिता मासिक ठेव योजना त्याचबरोबर एलकेपी कन्यादान ठेव योजना तसेच दाम दुप्पट, तिप्पट व एलकेपी दाम चौकट योजना ठेवीदारांसाठी अशा अनेक आकर्षक योजना असून केवळ शंभर दिवसांच्या ठेवीवर देखील ही संस्था सुमारे दहा टक्के व्याजदर देते. 46 ते 90 दिवसांकरिता सात टक्के,91 ते 180 दिवसांकरिता आठ टक्के,181 ते एक वर्षाकरिता दहा टक्के, तेरा महिने ते चोवीस महिन्यांकरिता साडेअकरा टक्के व 24 महिन्यांच्या पुढे ही संस्था साडेबारा टक्के व्याजदर देते. तसेच माजी सैनिक,अपंग,ज्येष्ठ नागरिक, विधवा भगिनी, संत महंत यांना चालू व्याजदरापेक्षा अर्धा टक्का ज्यादा व्याजदर देऊ केलेला आहे.
म्हणजे अशा व्यक्तींना 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका विक्रमी व्याजदर या संस्थेच्या वतीने ठेवीवर देण्यात येतो. कर्जांच्या देखील अनेक योजना असून विशेषतः छोटे-मोठे व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी ही संस्था वरदान ठरलेली आहे.तात्काळ व सुलभ कर्ज देऊन व्यवसायिकांना या संस्थेच्या माध्यमातून मोठा हातभार लागलेला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकविध व्यवसाय सुरू झालेले आहेत.या उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिल इंगवले त्याचबरोबर सहसंस्थापक सर्वश्री जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ.बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दुधाचे क्षेत्र, कपड्यांचे क्षेत्र,मोटार उद्योग, कृषी उद्योग आणि वित्तीय क्षेत्र यामध्ये उद्योगांचे मोठे जाळे उभे केले असून सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून आजवर शेकडो तरूणांच्या हातांना काम उपलब्ध झाले असून हजारो गरजूंच्या कुटुंबांना मोठा हातभार देखील लागलेला आहे. या उद्योग समूहाने नुकताच एक लाख लिटर दैनंदिन दूध संकलनाचा टप्पा पार केलेला आहे.या उद्योग समूहाचे वित्तीय क्षेत्रामधील अग्रगण्य पाऊल म्हणजे एलकेपी मल्टीस्टेट ही संस्था होय. वित्तीय क्षेत्रामध्ये भरारी घेत असलेल्या एलकेपी मल्टीस्टेटची शाखा मोठी व्यापारपेठ व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या डफळापूर येथे होत असल्यामुळे परिसरामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर लोकार्पण सोहळा यशस्वी करण्याकरिता व्यवस्थापक रोहित वठारे, वरदराज चव्हाण, रोहिणी पोतदार यांनी परिश्रम घेतले.