कायदेशीर हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असणे महत्त्वाचे | – न्यायाधीश ए बी जाधव | के एम कॉलेज येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

0
जत,संकेत टाइम्स : के.एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जत येथे महाराष्ट्र राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण दिवाणी न्यायालय जत आयोजित कायदे विषयक शिबिर घेण्यात आला.श्रीमाने सरांनी स्वागत केले.

 

जत दिवाणी ‌न्यायाधीस ए.बी.जाधव म्हणाले,राज्यघटनेच्या अभ्यास प्रत्येकाना गरजेचे आहे.बालकांवरील अत्याचार, बालकांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणाचा अधिकार या विषयांवर शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली.भारताचे भावी नागरिक म्हणून कायदेशीर हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असणे तेवढेच महत्त्वाचे आहे,असेही जाधव म्हणाले.

जत दिवाणी न्यायाधीश इ के चौगुले म्हणाले, अपघाती मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.अपघात घडल्यानंतर याबाबतची माहिती पोलीस,शासकीय दावाखान्यांना वेळेत दिली जात नाही.परिणामी विलंब झाल्याने अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो आहे. अपघातग्रस्त व्यक्तींचा मृत्यूला मला जबाबदार ठरवतील या कारणाने माहिती देणे टाळली जाते.म्हणून शासनाने नविन कायदा केला आहे.अशी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते,त्यांना कोणतीही माहिती विचारले जात नाही.त्यामुळे अशा घटना आपल्या आसपास घडल्यास तात्काळ पोलीस, शासकीय दवाखान्याना माहिती द्यावी,असे आवाहन न्यायाधीश चौगुले यांनी केले.

 

पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड म्हणाल्या, रस्त्यावरून जात असताना कोणत्या नियम पालन केले पाहिजे,त्यांचे ज्ञान प्रत्येकांना असायला पाहिजे.प्रा.जी एस माळी यांनी आभार मानले.कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी सहभागी झाले होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.