संखच्या सुजाता पाटील यांचा डॉ.कलबुर्गी फाऊंडेशनकडून गौरव

0
जत,संकेत टाइम्स : सिंदगी येथील डॉ.एम एम कलबुर्गी फाऊंडेशनकडून संखच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या  सुजाता पाटील यांना वचनसिरी व डॉ.शशिकांत पट्टण यांना साहित्यसिरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

न्यूझीलंडचे बसवसमिती अध्यक्ष डॉ.लिंगण्णा कलबुर्गी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.अनुग्रह कल्याण मंडप येथे डॉ एम एम कलबुर्गी फाउंडेशन घेतलेले वचनसिरी व वचन साहित्यसिरी प्रशस्ती प्रदान आणि सहविचारसभेचे उद्घाटनही त्यांच्याहस्ते संपन्न झाले.

 

यावेळी बोलताना डॉ. लिंगण्णा कलबुर्गी म्हणाले,डॉ.एम एम कलबुर्गी फांऊडेशनकडून अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेण्यात आली आहेत.सिंदगी येथे लवकरचं साहित्य परिषद घेण्यात येणार आहे.डॉ.एम एम कलबुर्गी यांच्या निधनानंतर सरकारने त्यांच्या नावे प्रतिष्ठान निर्मितीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्याच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

ते म्हणाले, डॉ.कलबुर्गी यांचे कार्य जग ओळखत आहे.पंरतू आपल्या सरकारनी त्याकडे लक्ष दिले नाही,यांची खंत असल्याचेही डॉ.लिंगण्णा कलबुर्गी म्हणाले.फाउंडेशनचे सलहासमिती सदस्य डॉ.एम एम पडशेट्टी व आमदार रमेश भूसनूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निवृत्त प्राचार्य बी एम बिरादार, डॉ.शशिकांत पट्टण,धारवाडचे संशोधकी डॉ.विणा हूगार व संशोधक डॉ. एस के कोप्प यांनी डॉ.एम एम कलबुर्गी यांच्या जीवन कार्याविषयी विचार मांडले.विजयपुरचे डॉ.फ गु हळकट्टी, संशोधन केंद्राचे कार्यदर्शी डॉ.एम एस मदभावी,फाउंडेशनचे अध्यक्ष शिवलिंग कलबुर्गी,लीना कलबुर्गी, डॉ अरविंद मनगुळी, अशोक वारद,डॉ चन्नप्पा कट्टी,संख, खोजनवाडी,कोळगिरी,  डफळापूर,जतचे अनेक शरण शरणी उपस्थित होते.वचन गायन व महिळा कवी गोष्टी कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.