जत पूर्व भागातील पशुपालकांना परराज्यातील ढग्यांनी लोखोला गंडविले | हभप तुकारामबाबा महाराजांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

0
जत,संकेत टाइम्स : जत पूर्व भागातील पशुपालकांना गंडविण्याचा नवा फंडा वापरून परराज्यातील ढगे फसविण्याचा उद्योग करीत आहेत. अशा ढग्यांवर कारवाई करावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह.भ प. तुकाराम बाबा महाराज यांनी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे केली.पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी याची दखल घेऊन याचा तपास करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

जत तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाचा सामना करीत आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीबरोबरच जोड धंदा म्हणून पशुपालन करीत आहे. चांगल्या प्रतिचे व दर्जेदार जातीचे जनावरे खरेदी करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल असतो. याचाच फायदा परराज्यातील ढेगे घेत आहेत. यात राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील ढग्यांची संख्या जास्त आहे. हे ढगे फेकबुक, व्हॉटसएप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधतात व ऑनलाइन रक्कम ट्रान्स्फर करून घेऊन लाखो रुपायला गंडा घालत आहेत.

 

जत तालुक्यातील सोन्याळ येथील राजू सरगर या पशुपालकाची लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
फेसबुकवरील जाहिरात बघून राजू सरगर यांनी राजस्थानच्या जयपूर येथील कैलास चंद यादव याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. यादव याने व्हिडीओ कॉल करून जर्सी गायी दाखवल्या. गायी पसंत पडल्यानंतर १ लाख ६० हजारला व्यवहार ठरला. त्यातील वेळोवेळी १ लाख १६ हजाराची रक्कम ऑनलाइन जमा करून घेऊन जर्सी पाठवतो असे सांगितले. मात्र जर्सी पाठविले नसल्याने परत संपर्क साधला असता सर्व रक्कम ट्रान्स्फर करा तरच जर्सी पाठवू असा पवित्रा कैलास यादव याने घेतला आहे. शिवाय रक्कमही देण्यास टाळाटाळ करीत आहे.

 

Rate Card
फसवणूक झालेल्या या पशुपालकाला घेऊन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह.भ प. तुकाराम बाबा महाराज यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांना घडलेला सगळा प्रकार सांगून या एका शेतकऱ्याची फसवणूक झाली नसून परराज्यातील या ढग्यांनी अनेक शेतकऱ्यांनी असाच नवा फंडा वापरून लाखो रुपयांना गंडवले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तुकारामबाबा महाराज यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.

 

पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी याची तात्काळ दखल घेतली. अशा फसवणूक झालेल्या पशुपालकाशी संपर्कसाधून त्यांना गंडविणाऱ्या ढग्यांवर सायबर विभागाची मदत घेवून कारवाई करावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना मोबाईलवरून संपर्क साधून पशुपालकाच्यात जनजागृती करण्याच्या सूचना देवून तक्रार आल्यास गुन्हा दाखल करा असे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.