खाकी मधील दुर्गांचा असाही सन्मान

0

कवठेमहांकाळ : जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जग उद्धारी आपल्याकडील ही खूप प्रचलित म्हण.ही म्हण खरी ठरवणाऱ्या असंख्य महिलांनी आपल्या कर्तुत्वाने समाजाच्या आणि देशाच्याही विकासात मोलाचे योगदान दिले आहे.आज एक ही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल कर्तुत्व सिध्द केलं नसेल.अगदी खास पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही त्या आत्मविश्वासाने वावरताना दिसतात.शिक्षण आणि त्यामुळे येणारी सजगता,स्वतबद्दलच्या जाणीवा आणि नेणीवांनी आजची स्त्री खूप बदलली आहे. जुन्या अनिष्ट चालीरीतीना तिलांजली देऊन नव्या बदलांना आपलेसे करत,हरतऱ्हेचे आव्हान स्वीकारत आणि मुख्य म्हणजे बाहेरचे करियर करताना घरातील जबाबदाऱ्या देखील तितक्याच समर्थपणे आणि प्रामाणिकपणे पेलनाऱ्या महिलांच्या कर्तुत्वाला खरतर सलामच आहे.

 

 

पोलिस या शब्दा बरोबर येणारी भीती,दरारा आपण सारेच अनुभवतो.मात्र बदलत्या प्रवाहानुसार आता पोलिस दलातही महिलांचे काम करण्याचे प्रमाण वाढले आहे.पाळण्याच्या दोरीची जागा आता पोलिसी दंडूक्याने घेतली आहे.समाजात तसेच राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर महिला पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे कारण त्या केवळ महिला असणं हेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी आश्वासक आणि दिलासादायक ठरत आहे.आपल्या तडफदार नेतृत्वाने प्रत्येक कामगिरी पार पाडणाऱ्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्त्रीसुलभ संवेदनशील स्वभावामुळे तक्रारदारच नव्हे तर गुन्हेगारामध्ये देखील अमुलाग्र बदल घडताना दिसत आहे.

Rate Card

त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा,रोजच्या कामातून त्यांना विसावा मिळावा तसेच नात्यातील गोडवा आणि आपुलकी वाढावी या उद्देशाने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कवठे महांकाळ मधील पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सविता दुबोले,रुपाली देसाई,प्रतिभा शिंदे,मनीषा बजबळे,जयश्री देवर्षी,वैशाली कोळेकर आणि इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

याप्रसंगी कवठे महांकाळ महिला राष्ट्रवादीच्या आघाडीच्या शहराध्यक्षा मिनाक्षी माने,तालुकाध्यक्षा सुरेखा कोळेकर,सुपर बझारच्या अध्यक्षा प्रियांका पाटील,डॉक्टर हर्षला कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुपर ग्राहक बझारच्या अध्यक्षा प्रियांका पाटील यांच्याकडून महिला पोलिसांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.यावेळी बबुताई‌ वाघमारे,पवित्रा खोत, दीपा जाधव,सायली जाधव,अर्चना पाटील, स्वाती यमगर‌,वर्षाराणी चव्हाण,छबुताई वाघमारे,सुलोचना माने तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.