जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार – पालकमंत्री
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन काम करीत असून जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या 56 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 205 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करून दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.
