जतेत दि.4 ते 8 फेबुवारी दरम्यान कृषी प्रदर्शन | आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0
जत,संकेत टाइम्स : जतचे लोकप्रिय आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित जत येथील सातारा रोडवरील बाजार समितीच्या भव्य पंटागणावर ता.४ फेंब्रुवारी ते ८ फेंब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय भव्य माळरान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले, असल्याची माहिती माजी सभापती बाबासाहेब कोडग व नाना शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या साठी विविध चर्चासत्रे,मार्गदर्शन केले जाणार आहेत.जत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रगत शेती,नवनविन उपकरणे,साहित्य खरेदी करता येणार आहेत.या प्रदर्शनात दि.4 ला,दुपारी २ वाजता, ऊस चर्चासत्र- श्री संजीव माने,दि.5 फेब्रुवारी सकाळी १० वाजता – डॉग शो,दि.6 फेब्रुवारी पशुप्रदर्शन सकाळी 10 वाजता,दि. 6 प्रक्रिया प्रक्रिया उद्योग महिलांसाठी मार्गदर्शन,दि.8 डाळिंब चर्चा सत्र- श्री बी टी गोरे सकाळी 11 वाजता असे कार्यक्रम होणार आहेत.

 

 

जतसारख्या माळरान भागात कृषी प्रदर्शन घेवून इथला शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपली प्रगतशील शेती करावी,म्हणून या माळरान कृषी प्रदर्शनाचे आयोजन होत आहे.
या प्रदर्शनात 300 हून अधिक स्टॉल्स व 3000 हून अधिक उत्पादनाचे स्टॉल असणार आहेत. हॉर्वेस्टर, ड्रिप इरिगेशन तसेच शेतीविषयक औजारे व यंत्रसामुग्री, बी- बियाणे, फर्टिलायझर्स, हरीतगृहे, जैव- विज्ञान, पशुपैदास, कुक्कूटपालन, डेअरी मशिनरी, अन्न साठवण प्रक्रिया, प्रकाशने, सॉफ्टवेअर्स अशा अनेक स्टॉलमधूूून
शेतकऱ्यांना नवीन उत्पादने,मशनीरी,
प्रदर्शन,मार्गदर्शन मिळणार आहे.मान्यवरांचे शेतीच्या विविध विषयांवर चर्चासत्र, द्राक्ष, बेदाणा,पेरु पिक स्पर्धा, धान्य महोत्सव, शेतकरी ते ग्राहक यांचे स्टॉल, सहजासहजी न मिळणाऱ्या वस्तूंचे कझ्युमर प्रदर्शन, महिला बचत गट व त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहान देण्यासाठी महिला बचत गटाने आयोजित केलेल्या फुड फेस्टिवल, अँग्रो स्टार्टअप, शासनाच्या विविध योजनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरीता सबंधीत अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. प्रदर्शनात शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान वापरुन शेतीमध्ये प्रगती केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.