डॉ.आर.के.पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा सांगली शिक्षण सेवक पतसंस्था निवडणुकीत दणदणीत विजय

0
सांगली : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी राजश्री शाहू पुरोगामी पॅनेलचा धुव्वा उडाला. या निवडणुकीत पारदर्शी पुरोगामी पॅनेलचे सर्व १७ उमेदवार एकतर्फी निवडून आले. सर्व उमेदवारांना २०० ते ४०० मताचे मताधिक्य मिळाले.दरम्यान, विजयानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मागील संचालक मंडळातील सात संचालकांनी राजीनामे दिले होते.त्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात येऊन संस्थेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर विरोधी पॅनेलमधून म्हणजे पारदर्शी पुरोगामी पॅनेलमधून चार उमेदवार पुन्हा निवडणूक रिंगणात होते. तर सत्ताधारी गटातील दोन उमेदवार राजश्री शाहू पॅनेलमधून निवडणूक लढवत होते. दोन्ही पॅनेलमध्ये ही निवडणूक चुरशीची झाली. खालच्या पातळीवर जात आरोप-प्रत्यारोप झाले. या निवडणुकीत चुरशीने ९४ टक्के मतदान झाले होते. मिरज येथील शेतकरी भवन मध्ये आज मतमोजणी झाली.
Rate Card
त्यात पारदर्शी पुरोगामी पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. विजय उमेदवार असे : किरण रावसाहेब पाटील, तानाजी रामचंद्र सावंत, विलास पांडुरंग यमगर, साहेबराव विलासराव भोसले,नारायण शहाजी निकम, निशांत विठ्ठल जाधव, संजय संभाजी पाटील, प्रमोद तानाजी मोरे, सिद्धनगोडा मल्लेशप्पा पाटील, अर्जुन योगीराज गिरी, रमेश बाबुराव लाड,उदयसिंह हेमंत पाटील, नीलम महादेव दळवी, अनिता अशोक घोरपडे, दीपक बापू शेस्वरे, संजय आप्पासो जाधव, नानासाहेब दगडू शेजाळ.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.