श्रीपती शुगर उत्पादनाचे सर्व उच्चांक गाठेल | – माजी मंत्री विश्वजीत कदम | श्रीपती शुगरच्या ५,५५१ व्या पोत्याचे पुजन

0
डफळापूर,संकेत टाइम्स : श्रीपती शुगर उत्पादनाचे सर्व उच्चांक गाठेल.यंदा २८०० रूपये टन हा दर जाहिर केला आहे. त्याशिवाय यापुढेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देईल,असे प्रतिपादन माजी सहकार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले.

 

जत तालुक्यातील डफळापूर (कुडणूर) येथील श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड या कारखान्याच्या ५,५५१ व्या साखर पोत्याचे पूजन माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी माजी मंत्री कदम बोलत होते.
या कार्यक्रमास ऋषिकेश लाड, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक परशुराम भोसले, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन महेश कदम यांचेसह
Rate Card
डफळापूर गावचे सरपंच, कुडनूर गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी व सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.