वसंतदादा पतसंस्थेच्या चेअरमन डॉ.विजय पाटील,व्हा.चेअरमनपदी डॉ.रोहन मोदी | बादल कांबळे,प्रशांत पोतदार नवे संचालक
जत,संकेत टाइम्स : येथील वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.विजय पाटील तर व्हा.चेअरमनपदी डॉ.रोहन मोदी यांची बिनविरोध निवड झाली.आज संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठक झाली.त्यात सर्वानुमुते ह्या निवडी करण्यात आल्या.
जत शहरातील छोट्या-मोठ्या दुकानदारांना अर्थपुरवठा,ठेवीदारांना योग्य मोबदला देणारी संस्था म्हणून वसंतदादा पतसंस्थेचा नावलौकिक आहे.
नुतन संचालकपदी बादल कुमार कांबळे व प्रशांत विलास पोतदार यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे माजी चेअरमन डाॅ. देवानंद वाघ साहेब,डॉ.मनोहर मोदी,डॉ. हरीष माने सर,डॉ.महेश पट्टणशेट्टी सर, माजी प्राचार्य सिद्रामप्पा सोलापुरे, बँकेचे मॅनेजर दत्तात्रय सोनार,दुय्यम निंबधक कार्यालयाचे अधिकारी मल्लेश कोळी तसेच सर्व संचालक,सभासद व संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

पारदर्शी कारभार करूसंस्थेचा शहरात नावलौकिक आहे,ठेवीदार,कर्जदारांचे हित जपण्याबरोबर पारदर्शी कारभार करून,संस्थेचा विस्तार वाढवू,असे यावेळी चेअरमन डॉ. विजय पाटील व व्हा.चेअरमन डॉ.रोहन मोदी यांनी सांगितले.
दोन नव्या संचालकांची निवडवसंतदादा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन संचालकपदी येथील बादल कुमार कांबळे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे, तर प्रशांत विलास पोतदार हेही नवीन संचालक झाले आहेत.