येळवीत चिंचणीला निघालेल्या बैलगाडी मालक, चालकांचा सत्कार | श्री संत बाळूमामा देवस्थान कमेटीचा अनोखा उपक्रम

0

जत : कर्नाटकातील चिंचणी येथील श्री मायाक्का देवीची यात्रेला बैलगाडी घेवून निघालेल्या बैलगाडी मालक व चालकाचा सत्कार येळवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित श्री संत बाळूमामा देवस्थान कमेटीच्या वतीने करण्यात आला.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. मायाक्का देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. नऊ फेब्रुवारीला बोनी ( नैवेध) दाखविण्याचा मुख्य दिवस आहे. यात्रेला आजही अनेक भाविक आपल्या लाडक्या सर्जा-राजाला घेवुन सहकुटूंब बैलगाडीने जातात. यंदा येळवी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामा देवस्थानच्या वतीने बैलगाडीने निघालेल्या गाडीमालक, चालकाचा गमजा, टोपी घालून सत्कार करण्यात आला. तसेच देवीच्या दर्शनाला निघालेल्या या भाविकांसाठी पाण्याची बाटली व फळांचे किट देण्यात आले. पुढील वर्षी येळवीहून जाणाऱ्या सर्व गाडयांना किट वाटपाचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

 

Rate Card

यापूर्वी देवस्थानच्या वतीने येळवीतील सर्व शिक्षकांचा सत्कार, दिवाळीत ४० निराधारांना फराळ वाटप तसेच डोंगरावरील श्री मायाक्का देवीच्या ठिकाणी बसण्यासाठी सिमेंट बाकडे देण्यात आले आहेत. बाळूमामांच्या भक्तांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, भाविक मोठ्या सांख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.