सांगलीत तब्बल पाच कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त | दोघे तस्कर पकडले

0

 

सांगली : व्हेल माशाची उलटी(अंबरग्रिस)तस्करी करणारी टोळीला सांगली गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून अंदाजे पाच कोटी १९ लाख २५ हजार रूपये किंमतीची ५ किलो ७१० ग्रँम वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली आहे.याप्रकरणी सलीम गुलाब पटेल रा.सांगली, अकबर याकुब शेख रा.पिंगोली ता.कुडाळ यांना ताब्यात घेतले आहे.जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने ही कारवाई केली आहे.

 

पथकाने सांगली जिल्ह्यातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शामराव नगर सांगली मधील डॉ.एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ दोन इसम अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये उच्च मागणी असलेले व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) विक्री करणे करीता घेवुन येणार आहेत अशी माहिती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे वरील सपोनि संदीप शिंदे यांनी मिळाले बातमी प्रमाणे शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ लावुन वॉच करीत असताना एक पांढ-या रंगांच्या अँक्टीव्हा दुचाकी वाहनावर एक इसम थांबला दिसला त्याच्याजवळ एक पांढऱ्या रंगांची बोलेरो पिकअप उभी असले वाहनातुन एक पिवळसर रंगांचा बॉक्स घेवुन खाली उतरला, त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आलेने त्या दोन इसमांना पंच म्हणुन सोबत असले वन विभागाकडील अधिकारी यांचे समक्ष पकडुन सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव सलीम गुलाब पटेल, अकबर याकुब शेख असे असल्याचे सांगितले.

 

Rate Card

सदर इसमांना त्याठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधान कारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्या दोन इसमांची वन विभागाकडील अधिकारी व उपस्थित असले पंचासमक्ष सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांची अकबर याकुब शेख अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पुठ्यांची बॉक्स मध्ये पिवळसर तांबुस रंगांचे ओबड धोबड आयताकृती आकाराचे घट्ट पदार्थ असलेले ८ नग मिळुन आले. त्याबाबत अकबर याकुब शेख यास विचारले असता त्याने सांगितले की, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असुन आमचा आणखी एक साथीदारा आचरा ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याने विक्री करणे करीता दिला असुन तो सलीम गुलाब पटेल यांचे मध्यस्तीने विक्री करणे करीता घेवुन आलो असल्याचे सांगितले.सदर इसमांचे कब्जात मिळुन आलेला पदार्थाची वन विभागाकडील अधिकारी यांनी व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ याची प्राथमिक तपासणी करुन तो पदार्थ व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) असलेचे सांगुन त्यावर प्रतिबंधित असल्याचे सांगितले व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो १ कोटी रुपये इतकी किमंत असल्याचे सांगितले.

 

त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी अकबर याकुब शेख याचे कब्जातुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५ कोटी ७५ लाख ५० हजार १० रुपयाचा व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) व त्याचे कब्जात मिळाले २५ हजार
रुपये किंमतीचा अँक्टीव्हा मोपेड गाडी, ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकुण ५ कोटी, ७९ लाख,२५ हजार १० रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने सपोनि संदीप शिंदे यांनी जप्त करुन त्या दोघांचे विरुध्द सांगली शहर पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.