महिला कर अधिकारी यांना १५ हजाराची लाच घेताना पकडले

0
सांगली,संकेत टाइम्स : येथील राज्य कर उपायुक्त
कार्यालयातील व्यवसाय कर अधिकारी वर्ग २ स्वप्नाली सतीश सावंत (वय ३९ रा.
गेस्ट हाऊस नजीक, ताकारी, ता. वाळवा )
यांना आज पंधरा हजार रुपयाची लाच
घेताना रंगेहाथ पकडले.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर,परफॉरमन्स बोनस यावरील विलंब शुल्क माफी आणि वाढीव रकमेची नोटीस न देण्यासाठी ही लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी, तक्रारदार महिलेकडे कर अधिकारी स्वप्नाली सावंत यांनी विलंब शुल्क माफी आणि वाढीव रकमेची नोटीस न काढण्यासंदर्भात २५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. ८ रोजी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
विभागातील तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यामध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी राज्य कर उपायुक्त कार्यालय, वस्तू व सेवा कर भवन येथे सापळा रचला. तक्रारदार महिला आणि कर अधिकारी सावंत यांच्यात चर्चा होऊन पंधरा हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार स्वप्नाली सावंत यांना तक्रारदार महिलेकडून पंधरा हजाराची लाच स्विकारली. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सावंत यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी सावंत यांच्याविरुध्द संजयनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमानुसार रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल केला.उद्या त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस उपअधिक्षक संदीप पाटील,निरिक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी,अंमलदार धनंजय खाडष, सीमा माने,सलीम मकानदार, राधिका माने आदींनी कारवाई केली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.