केबल,बँटरी, डिजेल चोरणाऱ्या दोघांना अटक | जत पोलीस ठाण्याकडीलही गुन्ह्याचीही छडा

0
सांगली,संकेत टाइम्स : जिल्ह्यात विविध ठिकाणी केबल, बॅटऱ्या तसेच डिझेलची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे पाच गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.त्यांच्याकडून दोन बॅटऱ्या, पॉवर केबल, डिझेल चोरीची रोकड एक गाडी असा सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

 

प्रशांत प्रकाश चौगुले (वय २२), अविनाश पांडुरंग वाघमारे (वय २८, दोघेही रा. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एलसीबीला सूचना दिल्या आहेत.त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक विशेष पथक तयार केले होते.पथक वाळवा परिसरात गस्त घालत असताना वाळव्यातील हुतात्मा चौकात एक गाडी (एमएच ४२ एम २७२४) घेऊन दोघेजण बॅटरी विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी बॅटऱ्या,पॉवर केबल तसेच डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली.दोघांनाही अटक करून त्यांच्याकडील चोरीच्या बॅटऱ्या,पॉवर केबल, तसेच डिझेल विक्रीची रोकड, गुन्ह्यात वापरलेली गाडी असा सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

त्यांच्याकडून आष्टा, तासगाव, कवठेमहांकाळ, इस्लामपूर,जत पोलिस ठाण्यात दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. दोघांनाही आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक डॉ. तेली,अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या मागर्दशर्नाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप
नलावडे, विनायक सुतार, चेतन महाजन, दीपक गायकवाड,प्रशांत माळी, ऋतुराज होळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.