बाबरवस्ती(पांडोझरी)येथे ७ वी शिक्षण परिषद संपन्न
संख : आसंगीतुर्क केंद्राची शिक्षण परिषद बाबरवस्ती (पांडोझरी)जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे आयोजित करण्यात आली होती.उपस्थित सर्व शिक्षक यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते लेखन साहित्य व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रांरभ करण्यात आला.
शिक्षण परिषदेत आसंगीतुर्क केंद्रातील वर्ग एक ते आठचे सर्व शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते.केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी शिक्षण परिषदेचा उद्देश समजावून सांगितला परिषदेत घ्यावयाचे विषय यांची कल्पना समावून सांगितली.शिक्षण परिषदेत केंद्रातील एकूण एकवीस शाळा सहभागी झाल्या होत्या.मोहन टोणे यांनी (NAS)नास आधारीत चाचणी १ बाबत चर्चा व नास चाचणी २ चे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.

द्वितीय तासिका दिलीप वाघमारे यांनी घेऊन यशोगाथा लेखन व सादरीकरण संदर्भात मार्गदर्शन केले उदाहरणासह समजावून सांगितले.SCERT कडील अध्ययन स्तर अभ्यास सर्वेक्षण नंतर विद्यार्थ्यांचे क्षमता वाढीसाठी शालेय स्तरावर करायच्या उपयोजना याबाबत चर्चात्मक सादरीकरण प्रत्येक शाळेतील एक प्रतिनिधी यांनी केले. इयत्ता पहिली दुसरी तिसरी व सहावी गुणवत्ता शोध परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले.अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांकरिता उपचारात्मक अध्यापन याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी अभिजित माळगोंडे सर, सुनिल चव्हाण सर, नामदेव जाणकर सर विषय दिलें होतें.केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी दैनंदिन आढावा, शालेय गुणवत्ता याविषयी आढावा घेऊन शिक्षण परिषदेची सांगता झाली.