कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार : आमदार सुमनताई पाटील

0
कवठेमहांकाळ,संकेत टाइम्स : आपल्या ज्ञानाचा,आरोग्य शैलीचा,शिक्षणाचा आणि विचारांचा प्रभावी उपयोग आरोग्य यंत्रणा रुग्णाची सेवा करताना वापरतात.मृत्यूशी झुंज देणाऱ्या आजारी रुग्णांचा जीव सुद्धा वाचवण्याची कसब आणि धाडस या आरोग्य यंत्रणेमध्ये दडलेले असते.परंतु कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील हीच आरोग्य यंत्रणा रिक्त पदामुळे काहीशी मोडकळीस आल्याचे तसेच अतिरिक्त भार असलेल्या कर्मचारी वर्गावर पडत असल्याचे चित्र आहे.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई आर.आर.(आबा) पाटील यांनी आज दिनांक ९ फेब्रुवारी रोजी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबीरास भेट दिली.यावेळी रुग्णालयात असणाऱ्या त्रुटी,अडचणी तसेच इतर समस्या दूर करण्याबाबत नागरिकांनी मागणी केली. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.भोसेकर व डॉ.कांबळे यांनी कर्मचारी कमी असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून तत्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी केली.या मागणीची दखल घेत आमदार सुमनताई पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटून लवकरच त्रुटी दूर करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करु अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,पांडुरंग पाटील,आय्याज मुल्ला,नगरसेवक विश्वनाथ उर्फ बंडू पाटील,संजय कोठावळे,प्रा.राजाराम पाटील,प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कोळी तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.