अनिल इंगवले यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान

बँकिग क्षेत्रासह विविध उद्योगात आपला उल्लेखनीय ठसा उमटविणारे सूर्योदय उद्योगाचे अनिल इंगवले यांना राज्यस्तरीय 'महाराष्ट्र गौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले.

0

सांगोला : सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांना राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली असून सध्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे.

 

त्यानिमित्त देशभरामध्ये ठीक ठिकाणी विविध स्तरांवरती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.राष्ट्रभक्ती जनविकास संघटना भारत यांच्यावतीने पुणे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.देशाच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक,सामाजिक,औद्योगिक, प्रशासकीय अधिकारी,संरक्षण, साहित्य व धार्मिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्यांनी उठावदार कामगिरी करून देशाच्या प्रगतीमध्ये आपले मोठे योगदान दिले आहे.

 

Rate Card

अशा महाराष्ट्रामधील काही नामवंत मंडळींचा यामध्ये समावेश होता.सांगोला तालुक्यातील अनिल इंगवले हे गेल्या 25 वर्षापासून लोक चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असून नेहरू युवा मंडळाच्या चळवळीद्वारे त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरुवात केली.पतसंस्था,गोल्ड फायनान्स, बचत गट,निधी बँक, त्याचबरोबर सूर्योदय अर्बन अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटविला असून अलीकडे एलकेपी मल्टीस्टेटच्या अनेक शाखांच्या मार्फत महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये त्यांनी काम सुरू केलेले आहे. सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून ते सामाजिक योगदान देत आहेत.त्यांची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.