जतच्या पत्रकारांचे प्रश्न व्हॉइस ऑफ मीडियाच सोडवू शकेल- सरपंच बसबराज तेली

0
Rate Card
व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा सोन्याळमध्ये सत्कार

जत,संकेत टाइम्स : दुष्काळी जत तालुक्यातील प्रश्न जतचे पत्रकार प्रामाणिकपणे मांडत असतात पण त्यांचे प्रश्न आजही कायम आहे. राज्यस्तरावर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाशी सांगली जिल्ह्यातील जत तालुका मराठी पत्रकार संघ हा संलग्न झाला आहे. जतच्या पत्रकारांचे प्रश्न व्हॉइस ऑफ मीडियाच सोडवू शकेल असा विश्वास सोन्याळचे सरपंच बसबराज तेली यांनी व्यक्त केला.

 

सोन्याळ येथे सोन्याळ ग्रामस्थ व हणमंत शिंदे परिवाराच्या वतीने जत व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोन्याळचे सरपंच बसबराज तेली होते.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सदस्य दत्ता सावंत, तालुकाध्यक्ष राजू माळी, डिजिटल सोशल मीडियाचे अध्यक्ष नजीरभाई चट्टरकी, कार्याध्यक्ष मच्छिंद्र बाबर, सचिव विकी वाघमारे, सहसचिव प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष हणमंत शिंदे,हणमंत बाबर,खजिनदार संतोष पोरे, तालुका संघटक सुभाष कोकळे कार्यवाहक तथा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कुलकर्णी, डिजिटल सोशल मीडियाचे सचिव आंबाणा माळी यांच्यासह माजी अध्यक्ष मारुती मदने, सुनील घाडगे, सदस्य नारायण भोसले,के. अजितकुमार, महावीर मड्डीमनी यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दगडू गारळे, सदस्य अशोक बिरादार, नितीन शिंदे, रफिक नदाफ, सुरेश तेली, बंडू कांबळे, सोसायटी संचालक बसवंत बिरादार, संपत कांबळे, तुकाराम वालीकार, कल्लप्पा शिंदे, भिमण्णा शिंदे,  चन्नप्पा नंदूर, संतोष केंगार, सिद्धाप्पा यत्नाळ,पत्रकार लखन व्हनमोरे, रामण्णा सन्नाळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी मारुती मदने, सुनील घाडगे, सुभाष कोकळे, के. अजितकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.