नोकरीच्या आमिषाने दोघाची १३ लाखाची फसवणूक

0
Rate Card
सांगली : पैसे घेऊन नोकरी लावण्याची आमिषे दाखवून फसवणूकीचे प्रकार काहीकेल्या थांबत नसल्याने सातत्याने समोर येत आहेत.आताही सांगलीतील दोघांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवत १३ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शैलेश विठ्ठल पेटकर (वय ४०, रा. प्रगती‌कॉलनी, सांगली) असेही संशयिताचे नाव आहे.हि घटना २० जून ते १८ ऑगस्ट २०२० च्या दरम्यान घडली आहे.

 

याप्रकरणी युसुफ मोहम्मदहुसेन नदाफ (रा. विनायकनगर,वारणाली, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. नदाफ यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत संशयीत पेटकर यांनी फसवणूक केली आहे. युसूफकडून भाऊ खालीद यांना नोकरी

लावण्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपये घेतले आहेत. तसेच फिर्यादी यांचे मित्र मुजफ्फर याची बहिण निलोफर यांना नोकरी लावतो म्हणून ८ लाख असे १३ लाख संशयित पेठकर यांने घेतले.

 

मात्र अनेक दिवसानंतरही नोकरी मिळाली नाही.नदाफ यांनी दिलेले पैसे संशयीत पेटकर यास अनेकवेळा परत मागितले.पण त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे‌ लक्षात येताच युसुफ नदाफ यांनी पोलीसात धाव घेतली आहे. पोलिसांनी संशयीत पेटकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.सातत्याने अशा घटना समोर येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.