जबरी चोरी प्रकरणी इचलकरंजीतील जर्मन टोळीतील ५ जणांना अटक
सांगली,संकेत टाइम्स : हरिपूर(ता.जत) येथे नदी काठावर फोटो काढणाऱ्या मुलींना पिस्तुल व शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती.याप्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करत लुटणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. यातील पाचही संशयित आरोपी इचलकरंजीतील जर्मन गँगचे सदस्य आहेत.
चोरट्याकडून मोबाईल, दोन दुचाकी, एक छऱ्याची पिस्तुल असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,अशी माहिती एलसीबीच्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
