शिवछत्रपतींचा हा पुतळा जतची ओळख बनेल | – जयंत पाटील

जत तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी मविआ सरकारच्या काळात ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे.

0

जत,संकेत टाइम्स : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याचे निर्माते, पुतळा समिती आणि इतर मान्यवरांचे मी अभिनंदन करतो. शिवछत्रपतींचा हा पुतळा जतची ओळख बनेल याचा मला पूर्ण विश्वास आहे,असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले,जयंत पाटील
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजे होते. सर्वसामान्य जनतेला सुखकर आयुष्य मिळावे यासाठी ते झटले. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीच्या देठालाही नुकसान पोहोचू नये याची काळजी त्यांनी घेतली. संपूर्ण जगाला त्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटतो.
Rate Card
छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर मुघलांविरोधात लढले. मात्र महाराज हे मुसलमानांविरोधात लढले असे चित्र आज निर्माण केले जात आहे. हे साफ चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारे होते. समतेचा विचार घेऊन चालणारे होते.
जत तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी मविआ सरकारच्या काळात ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. याबाबतच्या सर्व गोष्टी तयार आहेत. तसेच जत शहराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ३.३ एमसीएफटी पाणी देण्यात आले आहे. वर्तमान सरकारने लवकरात लवकर या योजनांना मूर्त स्वरूप द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे आदर्श राज्य निर्माण करावे, जतला सुफलाम सुफलाम करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.