येळवी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील येळवी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान कमेटीच्या वतीने येळवी येथे निसर्गरम्य परिसरामध्ये श्री संत बाळूमामा यांचे मंदिर उभारण्याची नियोजन करण्यात आले आहे या मंदिराची पायाभरणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री. संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून येळवीचे उपसरपंच विश्वास खिलारे, माजी उपसरपंच सुनील अंकलगी, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, संचालक सचिन माने, महेश शिंदे, धोंडीराम कुलाळ, सुरेश शेळके, जिव्हाळा उद्योग समूहाचे अध्यक्ष समाधान जगताप, शशिकांत महाराज गानमोटे, राजकुमार धोत्रे, रामहरी भंडे, बाळासो चव्हाण, राजू कदम, मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे, पारेकर सर , भारत क्षीरसागर , कोंडीबा माने, प्रकाश गुदळे, ज्ञानेश्वर आवटे ,सुनील साळे, प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी वसंत भंडे, राजाराम शिंदे, लक्ष्मण मदने, बयाजी बंडगर, शंकर आवटे, महेश मालगत्ते जालिंदर सांगोलकर, गोरख वगरे, लक्ष्मण गोयकर, नवनाथ चौगुले, रवी पवार, परमेश्वर जगदाळे, सुनील करे, डॉ. विवेकानंद स्वामी, अँड. सागर व्हनमाने, नितीन साळुंखे गजानन पतंगे, भाऊसो कदम, भाऊसो खरात, आंनदा रुपनूर, विठ्ठल गावडे, तुकाराम सुतार, नवनाथ पवार,रेवणराज येवले, शुभम पोतदार, विनोद शेळके ,मायाप्पा डोंबाळे, बाळासो तांबे , विक्रांत रुपनर दीपक चव्हाण नरेश शिंदे, नागेश शिंदे, प्रभाकर वगरे, रोहन धोत्रे, संतोष पोरे, मारुती मदने,बापू चव्हाण बबन गोयकर जनार्धन साळुंखे सुरेश पारेकर, सुधीर रुपनूर, आनंदा मदने, नवनाथ काळे, तानाजी व्हनमाने, संदीप मदने, गणेश वगरे, अमोल काळे,बाबासाहेब माने, गौरीहर सरगर, प्रफुल पारेकर आदी उपस्थित होते.
तालुक्यात श्री संत बाळूमामा यांचे भक्त मोठया प्रमाणात आहेत. येळवी येथे उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्य करावे असे आवाहन मठाधिपती तुकाराम बाबा यांनी केले. येळवी येथे उभारण्यात येत असलेल्या बाळूमामांच्या मंदिरामुळे येळवीच्या वैभवात भर पडणार आहे. पर्यटनाला चालना मिळेल असा पद्धतीने नियोजन करावे, सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती मदने यांनी केले तर आभार भारत क्षीरसागर यांनी मानले.
जत- येळवी येथे श्री संत बाळूमामा मंदिराच्या पायाभरणी प्रसंगी हभप तुकाराम बाबा महाराज, संचालक प्रकाश जमदाडे आदी.