शिवसेना जत तालुका संपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन | – उद्योग मंत्री उदय सामंत सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
जत,संकेत टाइम्स : जत शहरात शिवसेना या पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि. १९ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.जत शहरातील हॉटेल संभाजी पॅलेस नजिक असणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर,आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जत विधानसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यांचा होणार आज प्रवेश
उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे,उमदीचे नेते निवृत्ती शिंदे, पाणी संघर्ष समितीचे सुनील पोतदार व विविध पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्घाटना दिवशी उदय सामंत हे जत तालुक्यासाठी एक चांगली गुड न्यूज देतील असे योगेश जानकर म्हणाले.