श्रीपती शुगर डफळापूर कारखान्याचे वजन काटे बिनचूक | भरारी पथकाने केली अचानक तपासणी

0
18

डफळापूर,संकेत टाइम्स : श्रीपती शुगर ॲण्ड पाँवर लिमिटेड, डफळापूर कारखान्याच्या सर्व वजन काट्यांची भरारी पथकाने अचानक तपासणी केली.तपासणी दरम्यान सर्व वजन काट्यात कोणत्याही प्रकारचा दोष नाही.

 

वजन काटे बिनचूक असल्याचा भरारी पथकाने अहवाल दिला व श्रीपती शुगर चाचणी हंगामातच शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरला असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री.महेश जोशी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील वैद्यमापन शास्त्र विभागाला श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लिमिटेड, डफळापूर साखर कारखान्याचे ऊसाचे वजन करण्यासाठी वापरत असलेले सर्व वजन काटे तपासणीसाठी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी आदेश दिले होते.

 

त्यानुसार भरारी पथकाचे प्रमुख श्री. जीवन बनसोडे, तहसिलदार जत व
श्री. राजेश रामघेरे, पोलिस निरीक्षक जत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. उदय कोळी,(निरीक्षक वैधमापन शास्त्र जत), श्री. आर. एम. कुडचे, लेखा परीक्षक श्रेणी-१, सांगली,श्री.टी. एम. नायकुडे, लेखा परीक्षक श्रेणी-२, सांगली यांनी वजन काटयांची तपासणी केली.ऊसासह वाहनांचे वजन करून जी वाहने ऊस उतरविण्यासाठी गव्हाणीकडे गेली होती ती सर्व वाहने जशीच्या तशी परत वाहन काट्याच्या ठिकाणी फेर तपासणीसाठी बोलावून घेतली. दोन्ही वेळच्या वजनात तफावत आढळली नाही.

 

त्यानंतर कारखान्यामध्ये उपलब्ध असलेली प्रमाणित वजने सर्व वजन काट्यावर तपासणी केली असता बरोबर वजन दर्शवित असल्याचे आढळून आले.भरारी पथकाने वजन काटे बिनचूक असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या तपासणी दरम्यान कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. महेश जोशी, चिफ इंजिनिअर श्री. हितेंद्र शिरगुप्पे, मुख्य शेती अधिकारी श्री.हनमंत धारीगौडा, ऊस उत्पादक शेतकरी श्री. शिवानंद लिंगाप्पा करेन्नवार, श्री.सावंता आण्णाप्पा करेन्नवार व कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here