चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी,३ हाजाराची ‌लाच घेताना महसूल साहय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

0
Rate Card
आटपाडी,संकेत टाइम्स : आटपाडी तहसीलदार कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा रुचून लाच स्वीकारताना लिपिकास रंगेहात पकडल्याने महसूल मध्ये मोठी खळबळ माजली आहे.महसूल सहाय्यक महेबुब नाबिलाल बागवान,(वय ४२,सध्या रा. दत्त नगर,मज्जीद समोर आटपाडी, मुळ रा. मु.पो. लोहारा बुद्रुक इंदिरानगर, जि. उस्मानाबाद)या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचेवर दाखल असले गुन्ह्यांचे अनुषंगाने चॅप्टर केसची सुनावणी निवासी नायब तहसिलदार आटपाडी यांचे समक्ष सुरु आहे. सदर सुनावणीमध्ये वरीष्ठांना सांगुन चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर
सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी चॅप्टर केस टेबलचे काम पाहणारे महसुल सहायक महेबुब नाबिलाल बागवान यांनी स्वतःकरीता ५ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि. २०फेब्रुवारी रोजी अँन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

 

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये महेबुब बागवान यांनी तक्रारदार यांना चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३ हजार रुपये लाचेची मागणी करुन ३ हजार रुपये दोन दिवसात आणुन देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

 

त्यानंतर आज दि.२१ फेंब्रुवारी रोजी लोकसेवक महेबुब बागवान यांचे विरुद्ध तहसिलदार कार्यालय आटपाडी आवारात सापळा लावला असता, लोकसेवक महेबुब बागवान यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ३ हजार रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महेबुब बागवान यांचे विरुध्द आटपाडी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त अमोल तांबे,सुरज गुरव,
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील,पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी,पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदार, राधीका
माने ऋषीकेश बडणीकर, अतुल मोरे, सुदर्शन पाटील, चालक अनिस वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई आहे.
नागरिकांना आवाहन
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक
०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अँप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच१) मोबाईल अँप  www.acbmaharashtra.net,२) फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB,३) वेबसाईट  www.acbmaharashtra.gov.in
या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.