सांगली,संकेत टाइम्स : वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा,५० हजार प्रोसाहन अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा, द्राक्षाला हमी भाव जाहीर करा, दिवसा शेतीला वीज द्या, ऊस तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा आदीसह अन्य मागण्यासाठी सांगली इस्लामपूर रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने लक्ष्मी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन बुधवारी करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.
यावेळी युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले ,ज्येष्ठ नेते बाबा सांद्रे आदीच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. दिवसा वीज मिळालीच पाहिजे,वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबलीच पाहिजे,५० हजार अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेच पाहिजे, शिंदे सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडन्यात आला.यावेळी दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती.दोन ते तीन किलोमीटर रांग दोन्ही बाजूला लागल्याने तास ते दोन तास वाहतूक विस्कळित झाली.
यावेळी आंदोलका समोर बोलताना महेश खराडे म्हणाले,सद्या उन्हाळा आहे.त्यामुळे शेतीला पाण्याची गरज असते मात्र महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी मोहीम जोरात सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ही मोहीम तातडीने बंद करावी,दहा वर्षे बिल न देता अचानक तोडणी मोहीम कोणत्या कायद्यात बसते ही मोहीम थांबलो नाही तर वीज कार्यालये पेटवून देवू असा इशारा त्यांनी दिला.
५० हजार अनुदानाची चेष्टा सुरू आहे,तीन वर्षे घोषणा होवून ही अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत.काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र ६० ते ७० टक्के शेतकरी वंचित आहेत,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे नियमित कर्जदारांना ५० हजार अनुदान तातडीने मिळाले पाहिजे अन्यथा राज्य सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. खराडे पुढे म्हणाले,द्राक्षाचे दर ही प्रचंड घसरले आहेत.त्यामुळे द्राक्ष शेती परवडेनासे झाली आहे.द्राक्ष शेती वाचविण्यासाठी द्राक्ष बेदाण्याला हमी भाव जाहीर करावा.ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याची प्रचंड लूट सुरू आहे. कारखाना ही तोडणीचे पैसे बिलातून कपात करतो आणि मुकादम आणि मजुरालही पैसे द्यावे लागत आहे.ही लूट थांबविम्यासाठी मुकादम वर खंडणीच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे.
यावेळी दिपक मगदूम,शीतल सांड्रे,सरपंच सौ.रुपाली पाखरे,उपसरपंच प्रवीण कोले,प्रकाश मिरजकर,भरत चौगुले,सुरेश वसगडे, बाळासाहेब लिंबेकाई,शंतीनात लींबेकाई, सुधाकर पाटील,नंदू नलवडे,संदीप शिरोटे, सुरेश पाचीब्रे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली-इस्लामपूर रास्ता रोको आंदोलन केले.