जत,संकेत टाइम्स : गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारी आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागाच्या कणा बनून आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली.या काळात त्या पुर्णपणे थकून गेल्या होत्या म्हणून त्यांचा उत्साह कायम रहवा,त्यासाठी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आशा डे दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते किरण माने,स्त्रीरोग तज्ञ डॉ रविंद्र आरळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांरभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.डॉ.रविंद्र आरळी यांनी आपल्या भाषणातून आशा व गटप्रवर्तकांच्या कामाबद्दल भरभरून कौतुक केले. त्यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या साठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ५० टक्के वर मोफत उपचार करण्यात येईल असे सांगितले.
किरण माने म्हणाले कि, कोरोना काळामध्ये देवांचे मंदिरेही बंद झाले,आशा वेळी फक्त आणि फक्त आशा स्वयंसेविका या देवासारख्या धावून आल्या.त्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले म्हणून त्यांच्या कार्य शंब्दात व्यक्त करू शकत नाही,ऐवढे मोठे आहे.इतिहासात त्यांच्या कामाची नोंद होईल,असेही अभिनेते माने म्हणाले.
तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील उत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आशा व गटप्रवर्तकांच्या साठी भुपेद्र कांबळे यांचे अश्वघोष क्रिएशन यांच्या वतीने ही जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांची सुरेल मैफल सुर सप्तरंग आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्षा मिना कोळी, जिल्हा उपाध्यक्षा अंजुम नदाफ, जिल्हा संघटक कॉ.हणमंत कोळी, हेमा इम्मनावर, मालवण व्हणकंडे, वैशाली पवार, प्रमिला साबळे, सुनंदा सातपुते, संगिता माळी, गीता बाबर, आशा शिंदे, जनिता तांबे, सरिता पवार, वनिता भुसार, व तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
जत येथे आशाच्या कार्यक्रमात अभिनेते किरण माने यांनी सेल्फी घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले.