जत,संकेत टाइम्स : मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जी जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाचा शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसांच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी महत्वाची असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय, असा मोलाचा सल्ला राजे रामराव महाविद्यालयातील ज्या विध्यार्थ्यांची भारतीय लष्करात निवड झाली आहे त्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी दिला.
प्राचार्य डॉ. सुरेश पाटील पुढे म्हणाले की, सैनिक हे आपल्या देशाचे रक्षक असतात ते आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात. सैनिक हे देशाचे अभिमान आहे ते शिस्तप्रिय, धाडसी आणि निस्वार्थी आहेत. त्यांचे जीवन आव्हानानी भरलेले आहे. आणि प्रत्येक आव्हानाला ते हसतमुख चेहऱ्यानी सामोरे जातात. आपण सर्वजण आता सैनिक बनण्यासाठी आपल्या कर्तव्यावरती जात आहात त्यात कोणतीही कसूर करु नका असा मोलाचा सल्ला दिला. राजे रामराव महाविद्यालयाने दि. १० नोव्हेंबर ते दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर महाविद्यालयामध्ये ‘अग्नीवीर’ भरतीसाठी लेखी परीक्षा व मैदानी चाचणीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेतले होते.
त्याचेच यश म्हणजे कोल्हापूर ए. आर.ओ. मध्ये एकाचवेळी १५ विद्यार्थी भरती झाले. त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी एन.सी.सी. विभागप्रमुख कॅप्टन पी.ए. सावंत, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. अनुप मूळे, प्रा. दिपक कांबळे व प्रा. अभिजीत चव्हाण उपस्थित होते.
लष्करात भरती झालेले विद्यार्थी- अंडर ऑफिसर नागाप्पा खांडेकर (गरुड रेजिमेंट), कॅडेट गणेश बगरे (गोरखा रेजमेंट), कॅडेट विशाल माने (सिंग्नल कोअर), कॅडेट महेश कोळी (मराठा लाईट इनफंट्री), कॅडेट खोत महेश (अर्टलरी), कॅडेट दिपक जानकर (सिग्नल कोअर) कॅडेट आशिष लोंढे (मराठा लाईट इनफंट्री), कॅडेट सुनिल गडदे (अर्टलरी), कॅडेट नवनाथ कित्तूरे (मराठा लाईट इनफंट्री), कॅडेट महेश गळवे (पॅराशुट), श्री कट्टीमनी सुरज (पॅराशुट), श्री नेताजी पाटोळे (टेक्निकल), श्री अजय ऐवळे (ई.डी.), श्री प्रविण चौगुले (टेक्निकल) व श्री अनिल कनखडे (टेक्निकल) है भारतीय थल सेनेत रुजू होत आहेत तर अंडर ऑफिसर अस्मिता चव्हाण व कु. तनुजा पुजारी यांची भारतीय नौसेनेत निवड झाली आहे.प्राचार्य डॉ.पाटील, १६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगली चे अधिकारी व पी.आय.स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.प्रास्ताविक कॅप्टन पी.ए. सावंत यांनी तर प्रा.अभिजीत चव्हाण यांनी आभार मानले.
राजे रामराव महाविद्यालयात शिक्षणासह सैन्यभर्ती प्रशिक्षणावर भर दिला जात आहे.