शिमला,जम्मू-काश्मीरचे सफरचंद,आता जतेत पिकतयं | अंतराळमध्ये प्रयोग यशस्वी ; सफरचंदाच्या झाडांना फळे लकडली

0
3
जत,संकेत टाइम्स : शिमला,जम्मू-काश्मीरचे देशात प्रसिद्ध असेलेल्या सफरचंदांची बाग जत तालुक्यात बहरत आहे.भारतातील प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासह काही थंड असेलल्या उत्तर भारतात उत्पादन घेणारे सफरचंद फळाची मक्तेदारी मोडित काढण्याचे काम दुष्काळी जत तालुक्यातील खडकाळ जमिनीत सफरचंदाची यशस्वी लागवड करत,ती यशस्वी करण्याचा प्रयोग जत तालुक्यातील प्रसिध्द असणाऱ्या बनशंकरी नर्सरीचे माल सांवत बंन्धूनी केला आहे.यापुढे सांगली जिल्ह्यासह राज्यभर द्राक्ष,डाळिंबासह सफरचंदाच्या बागा बहरणार हे आता स्पष्ट झाले आहे.

 

जत तालुक्याच्या अंतराळ येथील प्रगतशील शेतकरी काकासाहेब सावंत यांनी आपल्या शेतीत सफरचंदांची लागवड करण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र सफरचंद हे थंड हवामान येत,असे चर्चेत होते.मात्र सफरचंदांची लागवड करून आपण पाचवीला पुजलेला दुष्काळ व उन्हाचा भडका असणाऱ्या जत तालुक्यात यशस्वी करण्याचा पण सांवत यांनी केला.त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणार्‍या काही शेतकर्‍यांशी चर्चा करत, त्यांचे मार्गदर्शन घेतले.आणि अगदी धाडसाने सफरचंदाची लागवड करायचीच असा निर्णय घेतला.गुगलवर सफरचंदाची अधिक सखोल माहिती धुडाळून काढत त्यावर अभ्यास करत येथील हवामानात सफरचंद लागवड करण्यासाठी अभ्यासतर केलाचं त्याचबरोबर त्यावर या भागातील हवामानावर संशोधन करत निश्चय करत सफरचंदांची रोपाची लागवड करत शिवधनुष्य उचलले.
सुरुवातीला त्यांनी हिमाचल प्रदेशातून ‘हरमन 99’ या वाणाची 150 रोपे आणून त्याची एक एकरात 12 फूट बाय 8 फूट या अंतराने लागवड केली. कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच सुकली.पुढील रोपाची योग्य काळजी घेतल्यानंतर जवळपास 125 रोपे जगली.उष्ण हवामान त्यातच पाण्याचा तुटवडा यामुळे अडचणी कायम होत्या.उपलब्ध पाणी ठिबकच्या माध्यमातून देत आवश्यक खतांचे डोस दिले.तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला.लागवडीनंतर दुसर्‍या वर्षी फळे धरली.आज बागेतील एका झाडाला साधारणत: 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100, 150 ते 200 ग्रॅम इतके आहे.आपल्या भागात सध्या सफरचंदाचा बाजारभाव सरासरी 200 रुपयांच्या घरात आहे. त्या हिशेबाने एकेका झाडापासून सुमारे 600 ते 1600 रुपयांपर्यत उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. यंदा बागेतील 125 झाडांच्या हिशेबाने यावर्षी 75 हजार ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.सावंत यांच्या बागेतील संध्या लागलेल्या सफरचंद हिमाचल प्रदेशातून येणार्‍या सफरचंदाच्या‌ तोडीचे आहे. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा सारखाच आहे.
सावंत यांच्या या अभिनव यशस्वी प्रयोगामुळे जम्मू-काश्मिर प्रमाणेच सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग बहरली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत यांनी दाखवून दिले आहे.

 

शेतकऱ्यांकडून बागेला भेटी वाढल्या
यापूर्वी दुष्काळी जत तालुक्यातील शेतकर्‍यांना सफरचंदाचे झाड कसे असते हे देखील माहीत नाही परंतु सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सफरचंदाची बाग आज बहरली आहे, ही बाग बघायला दूरवरून लोक येऊ लागले आहेत. कृषि विभागाचे अधिकारीही या बागेला भेट देऊन या सफरचंद लागवडीची माहिती घेऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सावंत यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागातील अन्य काही शेतकर्‍यांनीही सफरचंदाची लागवड करायची सुरुवात केली आहे.

 

सावंत आणि त्यांचे कुटुंबिय अनेक
वर्षांपासून शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. त्यांनी शेतात आंबा, पेरू, लिंबू, चिकू, चिंच, सीताफळ, आवळा, डाळिंब व नारळ या फळपिकांची जोपासना केली आहे. विविध फळझाडांची कलमे ते स्वतः तयार करतात. सावंत यांनी आजपर्यंत आपल्या शेतीमध्ये केलेले वेगवेगळे यशस्वी प्रयोग विचारात घेवून राज्य शासनाने त्यांना यापूर्वीच ‘उद्यान पंडित’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
२ वर्षानंतर झाडास फळे येतात
सफरचंदाच्या लागवडीपासून 2 वर्षानंतर झाडास फळे येण्यास सुरुवात होते. साधारण बहार आल्यानंतर 130 ते 140 दिवसांपर्यंत फळे काढणीस परिपूर्ण पक्व तयार होतात. एका चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या झाडापासून साधारणत: 10 ते 12 किलो फळे प्रति वर्षी उपलब्ध होतात. डिसेंबरमध्ये सफरचंदाची पानगळ होते. जानेवारीत झाडाला फळधारणा होते. जूनपर्यंत फळांचा रंग हा पांढरा असतो, त्यानंतर फळ लाल होते. पुढील दोन ते तीन महिन्यात त्याची काढणी करून विक्री केली जाते.
दुष्काळी भागात शेतीतील नवा अध्याय
दुष्काळी भागात सफरचंदाची शेती यशस्वी होऊ शकते, हे सिद्ध करून दाखवत जत‌ तालुक्यातील पारपांरिक फाटा ‌देत वेगवेगळ्या फळाच्या भागाही घेऊ शकतो,खडकाळ शेतकऱ्यांसाठी सावंत यांनी अध्याय सुरू केला आहे. भविष्यात सफऱचंदाची लागवड वाढविणार आहे, तसेच दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना हे पीक घेण्यासाठी पुढे येणार हे निश्चित आहे. इतर पिकाच्या तुलनेत सफरचंदाच्या लागवडीत खर्च कमी आहे. शासनाने ड्रॅगन फ्रुटच्या धर्तीवर सफरचंद लागवडीसाठी अनुदान देऊन प्रोत्साहन द्यावे,अशी मागणी सफरचंद उत्पादक शेतकरी काकासाहेब सावंत,(अंतराळ) यांनी केली आहे.
अंतराळ(जत) येथील सावंत यांच्या शेतातील सफरचंद
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here