जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हा नियोजन समितीमधून विविध कामे मंजूर झाली आहेत.ही कामे व्हावीत यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी पाठपुरावा केला होता. या सर्व पाठपुरावा केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच २ कोटी २१ लाख रुपये रकमेची कामे सुरु केली जाणार आहे.
या मंजूर कामांतर्गत जत तालुक्यातील आसंगी, येळवी, उटगी, काशिलिंगवाडी, को. बोबलाद, आसंगी, दरीकोनुर, गुलगुंजनाळ, बेवनूर, हिवरे, बिरनाळ, खोजनवाडी, अमृतवाडी, जालीहाळ खुर्द, एकुंडी, बोर्गी खुर्द, वळसंग, उंटवाडी तसेच वळसंग या गावातील विविध विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत.
याद्वारे गावातील पक्के रस्ते, देवस्थान समोरील सभा मंडप बांधणे, पेविंग ब्लॉक बसवणे, सी.डी. वर्क करणे ही अशी महत्त्वपूर्ण कामे होणार असून नागरिकांना लाभ होईलच शिवाय समाजमंदिरे व सभामंडपाच्या निर्मितीमुळे धार्मिक विधी पार पाडणे देखील सोयीचे होणार आहे.