श्रीपती शुगरकडून १५ फेब्रुवारी पर्यंतची बिले खात्यावर जमा | संपुर्ण एकरकमी २८०० रुपये वर्ग

0
डफळापूर,संकेत टाइम्स : श्रीपती शुगर अँण्ड पाँवर लिमिटेड, डफळापूर या साखर कारखान्याने ऊसाचे बिल एकरकमी संपूर्ण रक्कम २८०० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री व श्रीपती शुगरचे चेअरमन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली आहे.गळीत हंगाम सन २०२२-२३ साठी डफळापूर येथील श्रीपती शुगर अँण्ड पाँवर लिमिटेड या साखर कारखान्यास ज्या शेतकऱ्यांचा ऊस १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत गाळपास पाठविला आहे.त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हि रक्कम जमा करण्यात आली आहे.
Rate Card

तरी संबंधीत ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपले बँक खाते चेक करावे.चाचणी हंगामातच कारखाना शेतकऱ्यांच्या व प्रशासनाच्या विश्वासास पात्र ठरला असेही चेअरमन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी संगितले.शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन व साखर उतारा अधिक देणाऱ्या को-८६०३२,SNK-९२२७, VSI-८००५ या ऊसाच्या जातीच्या बेण्याची लागवड आगामी काळात आपल्या शेतामध्ये करण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्रआप्पा लाड यांनी केले आहे.

 

तसेच शेतकऱ्यांना कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत तज्ञांचे मार्गदर्शन करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात आगामी काळात शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले. तरी ऊस उत्पादक शेतकरी यांनी त्याचा लाभ घ्यावा व येणाऱ्या हंगामात आधिकाधिक ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली शेतकऱ्यांच्या उत्कर्षात श्रीपती

शुगर नेहमीच अग्रेसर राहील असेही सांगितले.

 

 

यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत, कारखान्याचे जनरल मॅनेजर महेश जोशी, मुख्य शेती अधिकारी हनमंत धारीगौडा, केन अकौंटट संजय सुतार व कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.