डफळापूरचे अनिरुद्ध पुरोहित संजय घोडावत विद्यापीठात गोल्ड मेडल पुरस्काराने सम्मानित

0
डफळापूर,संकेत टाइम्स : येथील ज्ञानदिप क्लासेसचे संचालक अनिल पुरोहित सर यांचे चिरंजिव अनिरुद्ध पुरोहित यांने संजय घोडावत युनिव्हर्सिटीचा सन २०२३ चा गोल्ड मेडल व सायन्स सन २०२२ चा टॉपर आवार्ड प्राप्त करत डफळापूरचे नाव उज्वल केले आहे.

हेही वाचा – नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व जपणारे संजय घोडावतनेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व जपणारे संजय घोडावत

 

अनिरुद्ध पुरोहित यांने डफळापूर येथील राजे विजयसिंह डफळे हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण पुर्ण केले आहे.सध्या संजय घोडावत विद्यापीठ येथे उच्च माध्यमिक विभागात शिकत आहे.नुकताच घोडावत‌ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितित संपन्न झाला.

Rate Card

त्यात अनिरुद्ध याला यावर्षीचा सर्वोच्च गोल्ड मेडल, प्रशस्तीपत्र व १० हजार रूपये रोख देत त्यांचा सत्कार करण्यात आला.अनिरुद्ध यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

हेही वाचा – शिमला,जम्मू-काश्मीरचे सफरचंद,आता जतेत पिकतयं | अंतराळमध्ये प्रयोग यशस्वी ; सफरचंदाच्या झाडांना फळे लकडली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.