बिळूरकरांकडून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार
बिळूर : श्री काळभैरवनाथ बिळूर देवस्थानास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याने 70 लाख 26 हजार निधी मंजूर केल्याबद्दल व लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून लिंगायत समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बिळूरचे पं स सदस्य रामण्णा जिवणावर,माजी सरपंच तमण्णा भावीकट्टी,माजी सरपंच महांतेश गडीकर,श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटीचे सदस्य गुरुबसू कायपुरे,पुजारी मुडेगोळ व सोमनिंगा गजपगोळ उपस्थित होते.