जत पश्चिम भागात ४ तासचं वीज | महावितरण विरोधात असंतोष | दिग्विजय चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा

0
डफळापूर,संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील डफळापूर, बाज,अंकले,जिरग्याळ,मिरवाड सह गावावातील महावितरणच्या सब स्टेशनवरून दिलेल्या वेळेत वीजपुरवठा उच्च दाबाचा,व दिवसा आठ तास वीज सुरू ठेवावी,अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू,असा इशारा पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी दिला आहे.तसे निवेदन महावितरणला शुक्रवारी देण्यात आले आहे.

चव्हाण म्हणाले,डफळापूरसह पश्चिम भागातील जवळपास सर्वच गावातील शेतकरी कमी दाबाच्या विज पुरवठ्याने त्रस्त झाले आहेत.
शासनाने दिलेल्या दिवसा ८ तास काळातही स्थानिक सब टेशनमधून चार चार तास असे भाग करून वीज सोडली जाते.तसे न करता सर्व भागात पुर्ण ८ तास थ्री फीज उच्च दाबाचा विज पुरवठा करावा,८ तासातही अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा.याबाबत संबधित वायरमेन,अधिकारी यांना सातत्याने तक्रारी करूनही समस्या सोडविली जात नाही.सातत्याने जास्त लोड असल्याची कारणे दिली जात आहेत.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.उन्हाच्या तडाख्याने पिक वाळत आहेत,जनावरांना पाण्याची मोठी गरज असते.
परिणामी ज्यावेळी विज पुरवठा सुरू असतो,तेव्हाही कमी दाबाने विज सोडली जाते.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू होत नाहीत.गावांना पाणी पुरवठा करणाऱ्यांही मोटारींना अशा अडचणी आहेत.
अशा परिस्थितीने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला असून,महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा रास्ता रोको,उपषोण,आत्मदहन सारखे तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांसह करू असा निर्वानीचा इशारा दिग्विजय चव्हाण यांनी दिला आहे.संजय डांगे,बाळासाहेब माने,साहेबराव भोसले उपस्थित होते.
डफळापूर येथे महावितरणला निवेदन देताना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व शेतकरी
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.