अखेर शासकीय कर्मचाऱ्याचा संप मागे | मुंबईत घोषणा

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे.
सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत झालेल्या बैठकीत चर्चा यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून सांगण्यात आले आहे.
मागणीप्रमाणे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.