विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार
जत,संकेत टाइम्स : जत येथे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांसह चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.मुख्य सूत्रधार उमेश सावंत फरार झाल्याने खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण | पालकमंत्री, माजी मंत्री,आजी-माजी आमदार उपस्थित रहाणार

संशयित तिघे रेकार्डवरील गुन्हेगारपोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बबलू चव्हाण खुनाचा प्रयत्न,याच्यावरमारामारी यासारखे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.तर त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. निकेश मदने हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत मारामारी असे चार गुन्हे दाखल आहेत.आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.
संशयितांनी आठवडाभर केली होतीरेकीविजय ताड यांचा खून करण्यापूर्वी संशयितांनी ताड यांच्या हालचालीची आठ दिवस रेकी केली होती.ताड यांच्या घराजवळ असलेल्या शाळेजवळ आठ दिवस ते फिरत होते. त्यावेळी शाळेच्या बस चालकाला त्याचा संशय आल्याने त्याने मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले होते.पोलिसांच्या चौकशीत ते रेकॉर्डिंग पुढे आले. त्यामुळे हा खून संशयित बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती.खुनानंतर दोनच दिवसात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.खून प्रकरणात उमेश सांवत यांचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.