गोळीबाराचा थरार,कोयत्यानं हल्ला,सिनेस्टाईल घटना
नाशिक,संकेत टाइम्स : पैसे वसूल करण्यासाठी एकाला अडवून त्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आल्याची घटना नाशिक शहरात सातपूर परिसरात घडली आहे.भर दिवसा गोळीबार झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्बन नाका परिसरात हि घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
गोळीबाराचा थरार,कोयत्यानं हल्ला,सिनेस्टाईल घटना
अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील व्यवसायिक व नागरिकांमध्ये देखील प्रचंड घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी पोहचली आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार वसुलीच्या वादातून झाल्याचं समोर येत आहे.
विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार
पैसे वसूल करण्यासाठी एकाला अडवून त्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेत एक जण जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.