सांगलीतील तुंगची प्रतिक्षा बागडी ठरली पहिली ‘महिला महाराष्ट्र’ केसरीची मानकरी

0
4

महिला महाराष्ट्र केसरीची पहिला स्पर्धा सांगलीत व पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही सांगली जिल्ह्याला मिळाला असून वाळवा तालुक्यातील तुंग येथील प्रतिक्षा बागडी हिने कल्याणची वैष्णवी पाटील हिच्यावर मात करत हा बहुमान प्राप्त केला आहे. महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोण पटकावणार, याची उत्सुकता शुक्रवारी शिगेला पोहचली होती.सर्व लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.रंगतदार झालेल्या अंतिम फेरीत अखेर प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आणि प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावत सांगली जिल्ह्याचे नाव उज्वल केले.

 

हेही वाचा – IPL- 2023 | यंदा आयपीएल क्रिकेटमध्ये नवे नियम | नाणेफेकीनंतर कर्णधाराला मिळाला हा अधिकार

उपांत्य फेरीत प्रतिक्षा आणि वैष्णवी पाटील यांनी दणदणीत विजय मिळविले होते. प्रतिक्षाने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर ९-२ असा दमदार विजय मिळवला होता. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचा प्रतिक्षाला फायदा झाला होता. प्रतिक्षाला यावेळी २ गुण गमवावे लागले असले तरी तिने ९ गुणांनची दमदार कमाई केली होती.
दुसरीकडे कल्याणची वैैष्णवीने उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या कुशप्पाचा ११-१ असा मोठा विजय मिळत‌ दिमाखात अतिंम फेरीत प्रवेश केला होता. वैष्णवी धडाकेबाज खेळ करत वैष्णवीने उपांत्य फेरीचा सामना सहजपणे जिंकला होता.
प्रतिक्षा ही सांगलीतील वसंतदादा कुस्ती केंद्र येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले होते.

 

 

तिचे वडिल रामदास बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल होते.ते सध्या सांगली पोलीस दलात नोकरी करत आहेत. प्रतिक्षाची आतापर्यत १२ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि २२ वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आहे. प्रतिक्षाच्या‌ या यशानंतर बऱ्याच मुली कुस्तीत आल्या आहेत. पालकांचाही प्रतिसाद दिलासादायक ठरत आहे.सध्या प्रतिक्षा के.बी.पी.कॉलेज इस्लामपूर येथे पहिल्या वर्षात शिकत आहे.
वैष्णवी पाटील लढवी खेळाडू आहे.ती या स्पर्धेत मोठ्या फार्ममध्ये होती.

 

वडील दिलीप पाटील हे शेतकरी असून हॉटेल व्यावसायिक आहेत.कुस्तीचा कोणताही वारसा नसताना त्यांनी कुस्तीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला कुस्तीमध्ये उतरवले.वस्ताद पंढरीनाथ ढोणे बापूंच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान तालीम संघ नांदवली येथे सध्या वैष्णवी सराव करते.तिनेही अनेक स्पर्धेत यश मिळविले आहे.राज्यस्तरावर १० पदके तर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.आज शुक्रवारी झालेल्या अतिंम सामन्यात दोन्ही कुस्तीगीरांनी सर्वस्व पणाला लावून खेळ केला.मात्र यात सांगलीच्या प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आहे.तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

हेही वाचा-IPL- 2023 | यंदा आयपीएल क्रिकेटमध्ये नवे नियम | नाणेफेकीनंतर कर्णधाराला मिळाला हा अधिकार

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here