सांगलीतील तुंगची प्रतिक्षा बागडी ठरली पहिली ‘महिला महाराष्ट्र’ केसरीची मानकरी
महिला महाराष्ट्र केसरीची पहिला स्पर्धा सांगलीत व पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही सांगली जिल्ह्याला मिळाला असून वाळवा तालुक्यातील तुंग येथील प्रतिक्षा बागडी हिने कल्याणची वैष्णवी पाटील हिच्यावर मात करत हा बहुमान प्राप्त केला आहे. महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोण पटकावणार, याची उत्सुकता शुक्रवारी शिगेला पोहचली होती.सर्व लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.रंगतदार झालेल्या अंतिम फेरीत अखेर प्रतिक्षा बागडीने बाजी मारली आणि प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावत सांगली जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
हेही वाचा – IPL- 2023 | यंदा आयपीएल क्रिकेटमध्ये नवे नियम | नाणेफेकीनंतर कर्णधाराला मिळाला हा अधिकार
दुसरीकडे कल्याणची वैैष्णवीने उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या कुशप्पाचा ११-१ असा मोठा विजय मिळत दिमाखात अतिंम फेरीत प्रवेश केला होता. वैष्णवी धडाकेबाज खेळ करत वैष्णवीने उपांत्य फेरीचा सामना सहजपणे जिंकला होता.
प्रतिक्षा ही सांगलीतील वसंतदादा कुस्ती केंद्र येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले होते.
