फक्त नोकरी म्हणत बसू नका
सर्वांना नोकरी मिळणे शक्य नाही,त्यामुळे आपले नोकरीचे प्रयत्न चालू ठेवत अगदी अल्प भांडवलात सुरू होणारा एकादा स्व:ताचा व्यवसाय आपल्याला आर्थिक स्थैर्य देऊ शकतो.कोणताही व्यवसायात लाजू नका,साधे,साधे व्यवसाय करणाऱ्यांनी यशाचे शिखर गाठत देशात नाव मिळविले आहे.
आता आपल्या ग्रामीण भागात पतसंस्था,छोट्या बँका आपल्या छोट्या-मोठ्या व्यवसायांना आर्थिक हातभार लावण्यासाठी उपलब्ध आहेत.त्यामुळे भांडवल नसतानाही व्यवसाय सुरू करणं शक्य आहे. फक्त आपल्याकडे न लाजता कष्ठ करण्याची तयारी असणे महत्वाचे आहे.विशेष म्हणजे आपण सुरू केलेल्या उद्योगाचा आपण मालक असतो.
आम्ही तुम्हाला या लेखात अगदी अल्प भांडवलात सुरू होणाऱ्या ५१ उद्योगाची माहिती देणार आहोत.मनापासून केलेला उद्योग हमखास उत्पन्न मिळवून देणारा ठरतो.आपण आपल्या स्व:ताच्या कष्ठाबरोबर नाव मिळवा.हे करा अल्प भांडवली उद्योग…
असे आहेत अल्प भांडवलात सुरू करता येणार उद्योग
१)वडापाव विकणे,सर्व साहित्य बाजारात उपलब्ध आहे,जागाही कुठेही छोटी चालते : दिडपट नफा
२)आईस्क्रिम, कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा,फँक्टरीतून घेतले तर डब्हल नफा
३) विविध तलावात उपलब्ध असणारे मासे विकणे,कुठेही ग्राहक मिळतात. दिडपट नफा.
४) विविध हंगामातील फळे विक्री करणे,सध्या बाजारात आंबे,द्राक्षाना मागणी आहे.आपल्याच भागात उपलब्ध होणाऱ्या बागेतून होलसेल आणून रिटेल विकणे. : डब्बल नफा
५ )आपल्या भागात आता बाजार समितीनी फळेभाजीपाला बाजार(
तरकारी)सुरू केले आहेत.येथे अथवा शेतकऱ्यांच्याकडून थेट होलसेल भाजीपाला खरेदी करून रिटेल विकून अगदी दिडपट किंवा त्यापेक्षा जादा नफा मिळू शकतो.
६)आता सर्वत्र चवीने खाणार त्यांना विविध पदार्थ देणार असा फंडा बाजारात सुरू आहे.अशापैंकी एक उद्योग,मिसळ, पाणीपुरी, रगडा पुरी विकून दोनपट्ट पैसे मिळवता येतात.
७)खव्वयाचा आवडता पदार्थ कच्छी दाबेली.आपल्याच गावात एका कुठेतरी छोटी जागा, हातगाडी भाड्याने घ्या व चौप्पट नफा मिळवा.बाजारात दाबेली वेगळे प्रकार व पाव मिळतात.
८ )सर्वत्र मोठी मागणी असलेला चहा, काॅफी करुन विका,थेट केल्यास, पाचपट नफा.किंवा अनेक कंपन्याचेही चहा,कॉपी विकूनही पैसे मिळविता येतात.
९ )आवडता पदार्थ असणाऱ्या मूग भजीची विक्री करा.,डाळिंब,पालक,मिरची,कांदा असेही भजी प्रकारही फेमस आहेत. घरासमोर स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो,तिप्पट किंवा त्यापेक्षा जास्त नफा
१०)शहरी भागात मागणी असलेला ढोकळा विक्री. घरी ढोकळा,चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका,चांगला नफा आहे,या व्यवसायात
११ 】 साऊत इंडियन पदार्थ असलेल्या चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठात वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या,याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.नफाही तुफान..
१२】 आवडीची असणारी पोळी, घरीच पोळी भाजी बनवून कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा,अन्यही ऑडर मिळतील.
१३】 वर्षभर हंगामनुसार उपलब्ध फळांची विक्री करा.
१४ 】 कोकणसह अन्यभागात उपलब्ध होणारे शहाळे आणून विका,रोज तेच ते ग्राहक मिळेल, बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.
१५ 】 वाकळ,झोपटे, कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन घ्या व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे,वागळी करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा,पैसे मिळवा
१६】 अनेक कंपन्या,उद्योग,शिक्षण संस्थासह राजकीय कार्यक्रमाचे फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.दररोज काम मिळेल..
१७) गावागावात जाऊन सुट्ट्या उदबत्त्या,मेणबत्ता वजनावर विकता ये ताकत.
१८)मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.मागणीही चांगली मिळते.
१९) यात्रा,जत्रासह देवांचे वार या दिवशी मंदिराजवळ नारळ विक्री करा,नारळ आता आपल्या भागातील शेतकऱ्यांकडूनही होलसेल मिळतात.
२०)फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका,गावात स्टॉल लावा. यातही आहे मोठ फायदा.
२१) आपल्याच भागातील हाॅटेलला मोड आणून कडधान्ये पुरवणे
२२) हाॅटेलला बटाटे,कांदे खुप लागतात.होलसेल विक्री सुरू करा.
२३) वेगवेगळ्या चटणी घरी तयार करून थेट फूड मार्टला विका किंवा स्वतः रिटेल करा.
२४) लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर,घरातील सोफासेटसह अनेक वस्तूची कामे मिळतात.चांगल उत्पन्न मिळते.
२५) विविध मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात.हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.चांगला व्यवसाय
२६) कमी वीज खाणारे, एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका.अनेक ठिकाणी होलसेलरकडून असे बल्ब मिळतात.
२७) ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.,तेही चांगले उत्पन्न मिळवून देतात.
२८) महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता.भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते,घरी पहिली ते पाचवीपर्यतच्या मुलांचे क्लासही घेता येतात.
२९) प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे.मशनिरी कमी भांडवलात उपलब्ध आहेत. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.
३०)पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.घरातून व्यवसाय करता येतो.
३१)प्लंबिंग काम शिकून घ्या.अनेक इमारतीसाठी लागणारा व्यवसाय, दररोज हजार रुपये ‘सहज कमवा’.
३२)विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.,मागणीही मिळते.
३३)काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका,त्यांचे चूर्ण करूनही विक्री करता येते.
३४) देशी गाईचे गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.
३५)ग्रामीण भागात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.अन्य डेअरीनाही विकता येते.
३६) गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.पशु उत्पादक वाढल्याने यालाही मागणी मिळेल.
३७) फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.
३८)स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.
३९) आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे,फेटे बांधणारालाही व्यवसाय मिळतो.एका दिवसाला दोन हजार मिळतात.
४०) भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.
४१) उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता. शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता.चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.चिंचाचे चिचोकेही विकता येतात.
४२) कडक उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते.मागणीही आहे.
४३) बाजारात देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे.अनेक मुर्त्यांना मागणी आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.
४४)गावागावत मिळणारी वर्तमान पत्र,शालेय पुस्तके,वह्याची रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे.द्राक्ष,डांळिबासाठी चांगली मागणी आहे, अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५)जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.,जिमही सुरू करू शकता.
४६)शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.अन्य साहित्यही विकता ये ते.
४७)जिलेबीचे स्टॉल लावा,चांगली मागणी अल्प भांडवलात व्यवसाय करता येतो.डब्बल नफा
४८)धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.त्यामुळे कपडे लॉड्रीला देणारे मोठे ग्राहक आहेत.
४८)रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.
४९)कुठेतरी कोर्स करून, मोबाईल दुरूस्ती,विक्री,अक्सेरिज, रिचार्ज व्यवसाय चांगला फायदा मिळता येतो.
५०)लग्न,समारंभ,सोहळ्यासाठी लागणाऱ्या पत्रावळी,दरण,ग्लॉस,तयार करा,कमी किमतीत मशनरी मिळतात.घरातच सुरू करा व्यवसाय.
५१) सायकल,दुचाकी,पक्चर काढण्याचा व्यवसाय सुरू करा,चारपट नफा,फक्त कुठेतरी अनुभव घ्या..
कष्ठ करा,वेळ घालवू नका,
तुम्ही केलेले कष्ठ भविष्यात तुम्हालाचं चांगले दिवस देतील.