शाळेतून घरी येताना दोघे भाऊ शेततळ्याकडे गेले,दुर्देव्याने दोघांचाही बुडून मृत्यू,कुठे घडली घटना वाचा सविस्तर..

0

शाळेतून घरी परतत असलेले दोन लहानगे शेततळ्यात बुडाले असून ही ह्रदयद्रावक घटना रविवारी दुपारी बेडग (ता. मिरज) येथे घडली. शेततळ्यात बुडून आयन युनूस सनदी (वय ९) आणि अफान युनूस सनदी (वय ५) या दोघाचा बुडून मृत्यू झाला आहे.नागरगोजेवस्ती रस्त्यावर हे शेततलाव आहे.

हेही वाचा –आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक 

अधिक माहिती अशी, मिरज तालुक्यातील बेडगमधील आयन आणि अफान हे दोन भाऊ नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वस्तीकडे जात होते.रस्त्यावरील नागरगोजे वस्तीवर एक सरकारी शेततळे आहे.शेततळे पाहण्यासाठी लहान मुलगा अफान हा अगोदर शेततळ्यातील पाण्यात गेला.त्याला वाचविण्यासाठी मोठा मुलगा आयन हाही पाण्यात उतरला.त्याला लहान भावाने मिठी मारली.त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद झाली आहे.

Rate Card

हेही वाचा-असही घडू शकते | खेळाडू आणि लहानग्या प्रेक्षकांची जुगलबंदी कँमेरात कैद

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.