आपण पाणी नाही म्हणून शेती करण्याकडे दुर्लक्ष करतो,मात्र गटारीच्या पाण्यावर तब्बल ला खावर उत्पन्न काढता येते,हे कुठे घडले,वाचा खालील लेखा..
हेही वाचा-शेतकऱ्यांच्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान योजना व पात्रता
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) गावाने आता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. नदीकाठी असणाऱ्या ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीने गावातील सांडपाणी नदीत न सोडता ते एकत्रित करून त्या पाण्याचा पुनर्वापर करून दीड एकर ऊस लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.विधायक कामांसाठी एकी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान गाव कारभाऱ्यांपुढे नेहमी असते. या आव्हानावर ब्रह्मपुरीने मात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ब्रह्मपुरीची ओळख तयार होऊ लागली आहे.
हेही वाचा-विद्युतपंप चालू करायला गेलेल्या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू,वाचा कुठे घडली घटना..
२०२२-२३ या वर्षात ग्रामपंचायतीने दीड एकर ऊस लागवड केली व या उसासाठी गावातील नदीला वाहून जाणारे पाणी नदीमध्ये न सोडता नदीचे पाणी दूषित न करताऊस लागवडीसाठी वापरले आहे. या पाण्याचा योग्यरित्या पुनर्वापर करत आहे. या सांडपाण्यावर चांगल्या पद्धतीने ऊस आला होता. यातून कारखान्यास ३० टन ऊस गेला असून पहिले ६९ हजार रुपये बिल आले आहे. सदर उसाचा काही भाग जनावरांसाठी चारा म्हणून देण्यात आला.
हेही वाचा-महावितरणची शिरदवाडला पंचगंगा काठावर ‘टॉवर-गुढी’
त्यातून ग्रामपंचायतला २६ हजार ५२० इतकी कमाई झाली आहे. यावर्षीचे ग्रामपंचायतीचे
सांडपाण्यावरील निव्वळ उत्पन्न ९६ हजार ३१३
इतके मिळाले आहे. त्याचा उपयोग गाव विकासासाठी होत आहे. आज ही ऊस लागवड
खोडवा चालू आहे. यावरसुद्धा नवीन उत्पन्न
ग्रामपंचायतीस मिळणार आहे. याशिवाय सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा येथील विजेची गरज पूर्ण केली आहे. उर्वरित वीज महावितरणला दिली जात आहे. गावात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जात आहे सांडपाण्याचे योग्य नियोजन असल्याने स्वच्छता अबाधित आहे.