विद्युतपंप चालू करायला गेलेल्या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू,वाचा कुठे घडली घटना..
तरूण शेतकऱ्यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातील कोसारी येथे घडली आहे.रामचंद्र आनंदा वाघमोडे (वय.२१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.रामचंद्र हा गुरूवारी (ता.२३)सकाळी १० वाजता विद्युत पंप चालू करायला विहिरीवर गेला होता.घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे.